जाणीव
तुझ्या आहेपणाची
देहात पडलेली
सावली
घेवून मी जगतो
आहे
खरतर मी अजूनही
केवळ मानतो आहे
मी हा तूच आहे
तलावात पडलेल्या
प्रतिबिंबा सारखा
समजा ..
मी नाही मानले ते
तरीही ते
प्रतिबिंब
तुझेच असणार नाही
का?
आणि जर खरोखच मी
ते प्रतिबिंब
नसून
स्वत:ला खुश
करण्या करता
केलेला खटाटोप
असेल तर ?
आईने दाखवलेल्या
बागुल बुवा सारखा
तर ..?
तरीही हे जगणे
तेच राहीन नाही का
?
आणि मी कुणीही
नसलेला
तो एक देहधारी
सजीव
त्या न दिसणाऱ्या
अमिबा सारखा ..!!
पण मग ही जाणीव
असण्याची..
अन जाणण्याची ..
तिचे मूळ काय आहे
?
जे खुपत असते
मनाला
जगण्यातून उसंत
मिळताच
व जगण्याची
निरर्थकता
कळून येताच...
या अनाहत
प्रश्नांचा
मागोवा घेत घेत
मी येतो परत परत
त्या तिथेच
जणू काही मग
मीच तो प्रश्न
होतो
आणि वाटू लागते
बहुदा तो प्रश्नच
तुझे रूप असावे
माझ्या मधले !!
डॉ.विक्रांत
प्रभाकर तिकोने
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा