प्रेम असते अकारण
अनाहूत जाणीव
पौर्णिमेच्या
आकाशातील चंद्रबिंब सोलीव ||
का रे बाबा नभी
आला त्याला कोण म्हणते का ?
अरेरे आला
म्हणुनी डोळे झाकून घेतो का ?||
तो येतो नभी नि भरभरून
प्रकाश देतो
त्याचे नाते या धरेशी
युगांचे प्रकट करतो ||
मनी प्रेम येण्याहून
मोठे अरे पुण्य नाही
अमृताचा डंख होता
नाही कधी म्हणू नाही ||
फक्त प्रेम
करण्याने चंद्र मनी ओघळतो
अनाहती दाटलेला अडसर
दूर होतो ||
प्रेम दिवाणी
झाली राधा प्रेम विराणी मीरा
अवघे विश्व प्रेमानेच
आले इथे आकारा ||
विक्रांत प्रभाकर
तिकोणे
http://Kavitesathikavita.blogspot.in
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा