*************
फुलांचेच घर
फुलांचेच दार
फुलांचा बहर
अंगणात
फुलांची खेळणी
फुलांच्या वाटेनी
ठेवली रचुनी
सुंदरशी ।।
लालस पिवळे
गुलाबी पांढरे
दिसती साजरे
किती एक ।।
फुलात सजली
बाहुली निराळी
कालिका जाहली
स्वये जणू ।।
किती निरखावे
किती हरखावे
देहात भिनले
गंध किती।।
असेच व्हावे हे
सुमनांचे जग
आनंदाचे रंग
दारोदारी ।।
भ्रमर जाहले
विक्रांत पाहणे
एकताणतेने
समाधिस्त।।
डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोने
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा