गुरुवार, २ फेब्रुवारी, २०१७

शब्द ज्ञानदेव कानी



भरतात डोळे
दाटते आठव
शब्द ज्ञानदेव
कानी येता ।।

कुठल्या जन्माची
कळेना हि नाती
व्याकुळल्या चित्ती
आस दाटे ।।

हृदयी भरले
शब्दांचे चांदणे
मधुर जगणे
झाले माझे ।।

कधीतरी माये
घडो तुझी भेटी
तृप्त व्हावी दिठी
विक्रांतची।।

©डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

फुंकर

फुंकर  ****** माझिया प्राणात घाल रे फुंकर विझव अवघा लागलेला जाळ  मग मी जगेन होऊन निवांत  तुझ्या सावलीत दत्ता दिनरात  सगुण निर्गु...