खुळी खुशामत मन हे करता
नकळत नेता स्वप्नरंगी ||१||
उगा अचानक ध्यान हरवतो
मार्ग मी चुकतो माझ्यातच ||२||
परी गुरुदेव तोच अवधूत
घेवून परत जातो मज ||३||
खरेतर छोटी असते परीक्षा
परी नच शिक्षा नापासाला ||४||
हळूच हसतो मज थोपटतो
सरळ दावतो पुन्हा रस्ता ||५||
डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोने
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा