रविवार, १२ फेब्रुवारी, २०१७

बांधलेली नाती




बांधलेली नाती
----**-------

बांधलेली नाती
मानलेली प्रीती
तरी न सुटती
सखे बाई   ||

येतात कुठूनी
आवेग हे मनी
कळल्या वाचुनी
गूढ ध्वनी  ||

उडू उडू जाती
जन मन रिती
पण नवी मिती
नच दिसे ||

त्याच सीमारेखा
अडवती पाय
तडफड काय
सांगू शब्दी ||

विरेल वादळ
वा नेईल नभी
दारात मी उभी
जीवनाच्या ||

भाळीचे हे भाग्य
कसे विनटावे
मना सांभाळावे
व्यवहारी ||

मिळावा प्रकाश
जीवनाचे श्रेय
हरवून भय
मनातील  ||

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

रुतलेली आठवण

रुतलेली आठवण ************** मला घेरून राहिलेले हे एकाकी एकटेपण सवे माझी फुटकी नाव  अन निरर्थक वल्ह्वणे तरीही होतेच माझे हाक मारण...