फुलझडी १
तुजला पाहता मन फुलझडी।।
स्वरूपाची गोडी कळे त्याला ।।
तुझिया स्मरणे येते मोहरून
गंधाने वेढून जातो देह ।।
क्षणांचे आयुष्य देतो उधळून
तुजला जाणून अतरंगी
सावळा सुंदर प्राणांचा विसावा
मनी या राहावा सदोतीत ।।
डॉ विक्रांत प्रभाकर तिकोने
जेव्हापासून कळले मजला कि जीवनाचे नाव मरणे आहे . डोक्यास बांधून कफ़न मी ,त्या मारेकऱ्यास शोधतो आहे. (अनुवादित)
चित्र ***** तुझ्या डोळ्यावरील अर्ध पारदर्शक काचा मधून नाही वाचता येत मला तुझे डोळे अजून ती तुझी गंभीर आत्ममग्न मुद्रा राहते ...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा