सप्तशृंगी गडावर
आई बैसली डोंगरावर
नजर ठेवते पिलावर
स्नेहाळ दृष्टीने ||१||
तिचे रूप ते सुंदर
मुद्रा अति मनोहर
नेत्री करुणा सागर
दाटला अपार ||२||
शस्त्रे घेतली हातात
ती उगा वाटतात
तिच्या तेजाने साक्षात
काळाला हुडी ||3||
रामराय गणपती
मध्ये विश्रांती देती
दत्त साऊली धरती
भक्त माथ्यावरी ||४||
तिच्या सामोरी बसता
अवघा पसारा पाहता
अहंकार लटलटा
कापतो भयाने ||५||
विप्र शरण संपूर्ण
तुझ्या दारात येवून
मागे भक्तीचे मागण
माय जगदंबे ||६||
विक्रांत प्रभाकर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा