मंगळवार, २ सप्टेंबर, २०१४

कडवट क्षण







असे इतके कडवट 
असतात काही क्षण
कि उद्दिग्न विस्कळीत 
होते आपलेच मन

अरे कश्यासाठी अन
का हे अवघे म्हणून ?
पिंजारात भणाणत 
असतात व्यर्थ प्रश्न 

अश्यावेळी जाती सारे  
अर्थ भान हरवून
पायाखालती कळ्याही 
जातात मग चिरडून 

अस्तित्व भरुन अंती
उरे एक आक्रंदण
जाणवून जाते मन 
संवेदना बधिरून

आपलेच जीव प्राण
ओझे आपणा वाटून
घेतो वार धारधार 
स्वत:वरच करून

सगळाच अर्थ जातो
मग विच्छिन्न होवून
चालते जीणे ओढत 
मढे  मरणावाचून

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मारूत

मारुत ******  एक रुद्र हुंकार  भेदत जातो सप्त पर्वत  पृथ्वी आप तेज वायू  सारे आकाश व्यापत  थरथरते धरती ढवळतो सागर  उ...