सोमवार, २९ सप्टेंबर, २०१४

झुळूक





अलगद यावी
एक झुळूक
मंद शीतल
गंधित नाजूक
  
तशीच तू
सखये आलीस
मन प्रफुल्लित
करून गेलीस

तुझे येणे
बुद्ध्याच नव्हते
तुझे जाणे
उद्दंड नव्हते

सारे माझे
अस्तित्व परी
सखये सहज
निववून गेलीस

मनात आठव
डोळ्यात वाट
अधीर उत्सुक
तहान प्राणात

क्षोभ दाटली 
सारी घनवट
क्षणात दूर 
करून गेलीस

दिले काय तू
तुला न ठावे
तुजला माहित
फक्त वाहावे

मी सुखाचे
वस्त्र लेवून
मोर नाचरा
गेलो होवून

विक्रांत प्रभाकर


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

गिरनार परिक्रमा

गिरनार परिक्रमा *********** सरला प्रवास परी तुझा भास  वेढून मनास आहे दत्ता ॥१ माझे पदरव मज ऐकू येती  तरंग  गुंजती पाण्यावर ॥२ पा...