मी
मेल्यावर
तू
काय करशील
मी
मेल्यावर तू रडलीस तर
मला खरच
आश्चर्य वाटेल
किंबहुना
ते तुझे आजवरचे
सर्वात
श्रेष्ठ नाटक ठरेल
नकळे
कसे काय तू हे
मरण साजरे
करणार
बोलावून
मित्रांना मजेने
नच पार्टी
देता येणार
रंगवून
सजवून घराला
नच रोषणाई
करता येणार
सार
काही विकून किंवा
दूरवर
निघून जाता येणार
कुंकू
तर कधीच लावले नाहीस
बुरसटलेपणा
वाटतो तो तुला
मंगळसूत्र
शोभेचा केवळ दागिना
कधीकधी
उगा होता तू घातला
सौभाग्य
चिन्ह जोखड मानते
विधवा
तर तू आताही दिसते
त्यामुळे
ती तुझी एक चांगली
संधी फुका
गेली असे वाटते
तू रड
नको रडूस मेल्यावर
काय
फरक पडणार मला
माझी
मात्र सुटका होणार
एवढे
नक्की कळतेय मला
विक्रांत
प्रभाकर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा