एका
तुझ्या हाय करण्यानं
जीव
किती सुखावतो
हृदयाच्या
अवकाशात
पारव्यागत
घुमत राहतो
तुला
उगा वाटतं कि मी
आता आताच
इथं आलो
जाता
जाता तुला कुठतरी
सहज
रस्त्यात भेटलो
पण तुला
कसे कळावं मी
किती प्रहर
इथं थांबलो
तुझ्या
दोन शब्दासाठीच
रान जीवाचं
करून आलो
तू
पुढे गेल्यावरही माझे
पाय
तिथून उचलत नाही
त्या
हाय ला बाय करणे
खरच
मला जमत नाही
विक्रांत प्रभाकर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा