रविवार, १४ सप्टेंबर, २०१४

नकार




माझी सारी
जिंदगानी
नकाराचे
गाणे गाई 

तूझ्या एका
नकाराने
फार फरक
पडत नाही 

घाव पण
घाव असतो 
वेदना तर
मिटत नाही 

दे जराशी
सहानुभूती
स्वप्न अजून
सुटत नाही

विक्रांत प्रभाकर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आळंदीत . .

आलो आळंदीत  ************ आलो आळंदीत झालो आनंदीत  देव समाधीत पाहियला  भारावले तन भारावले मन  गर्जे कणकण ज्ञानदेव  जिवलग भेटी हरपल...