मंगळवार, ३० सप्टेंबर, २०१४

सप्तशृंगी गडावर




सप्तशृंगी गडावर 
आई बैसली डोंगरावर 
नजर ठेवते पिलावर 
स्नेहाळ दृष्टीने ||||
तिचे रूप ते सुंदर 
मुद्रा अति  मनोहर
नेत्री करुणा सागर
दाटला अपार ||||
शस्त्रे घेतली हातात
ती उगा वाटतात
तिच्या तेजाने साक्षात
काळाला हुडी ||3||
रामराय गणपती
मध्ये विश्रांती देती
दत्त साऊली धरती
भक्त माथ्यावरी ||||
तिच्या सामोरी बसता
अवघा पसारा पाहता
अहंकार लटलटा
कापतो भयाने ||||
विप्र शरण संपूर्ण
तुझ्या दारात येवून
मागे भक्तीचे मागण
माय जगदंबे ||||

विक्रांत प्रभाकर

सोमवार, २९ सप्टेंबर, २०१४

झुळूक





अलगद यावी
एक झुळूक
मंद शीतल
गंधित नाजूक
  
तशीच तू
सखये आलीस
मन प्रफुल्लित
करून गेलीस

तुझे येणे
बुद्ध्याच नव्हते
तुझे जाणे
उद्दंड नव्हते

सारे माझे
अस्तित्व परी
सखये सहज
निववून गेलीस

मनात आठव
डोळ्यात वाट
अधीर उत्सुक
तहान प्राणात

क्षोभ दाटली 
सारी घनवट
क्षणात दूर 
करून गेलीस

दिले काय तू
तुला न ठावे
तुजला माहित
फक्त वाहावे

मी सुखाचे
वस्त्र लेवून
मोर नाचरा
गेलो होवून

विक्रांत प्रभाकर


शनिवार, २७ सप्टेंबर, २०१४

साथ..







नसूनही साथ तुझी
तूच सोबत होती
हरवलेल्या रानातील
तूच वाट होती
कदाचित नसेल ही
तुला जाणीव ही
नकळत माझ्यासवे
तूच चालत होती
पदोपदी काटे अन
लाख खाचखळगे जरी
प्रत्येक माझ्या व्यथेवर
तूच फुंकर होती
रात्र सरलीय आता
आता प्रकाश वाटा
लाख तुला धन्यवाद
तूच प्रसाद होती

विक्रांत प्रभाकर


मागणे

मागणे ***** आता माझे हे एकच मागणे दत्तात्रयी राहणे घडो यावे ॥ हृदयी धडधड व्हावी दत्त दत्त  स्पर्शात दृष्टीत भरावा तो...