मच्छिंद्रनाथ
*********
काठावरती तडफडती मत्स्य पाहुनी द्रवला जती
क्षण भंगुर हे जीवन आहे
आले त्याच्या क्षणात चित्ती
सुवर्ण क्षण तो मग वेचून
चालू लागला साधनपथी
घोर कष्टला तपात दिव्य
झाला हिमालय नाथपंथी
आदिनाथ बीज हृदयी होते
अवधुते त्या प्रेमी सिंचले
झाड बहु जगी विस्तारले
श्रांता सावली देते जाहले
जातीभेद सारे मिटले
वर्णपंथ एक जाहले
मानवतेच्या पायावरती
देऊळ नवे उभे राहिले
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com
☘☘☘☘ 🕉️ .