दत्तात्रेय भक्तीगीत अभंग लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
दत्तात्रेय भक्तीगीत अभंग लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, २२ जानेवारी, २०२६

स्वामीभेट


स्वामी भेटी
********
कृपेचे कोवळे चांदणे पडले 
स्वामी भेटी आले 
अकस्मात
 नसे घरदार नसे ध्यानीमनी 
भाग्य उठावणी 
केली काही 
तोच स्वामीराय तोच ज्ञानदेव 
आला अनुभव 
अंतरात 
शशी चंद्र नावे जरी आन आन 
कैवल्याचे दान 
तोच एक 
विक्रांत भिजला चिंब अंतरात 
न्हाईला सुखात 
वरदायी

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .

माझी नर्मदा परिक्रमा

माझी  नर्मदा परिक्रमा  ***************** दिनांक 8 फेब्रुवारी 26 ते 27 जून 26 अशी 140 दिवसांची  परिक्रमा नर्मदा मैयेने पूर्ण करून...