पुन्हा
*****
पुन्हा तुला एकटक पाहू दे गं मला ॥
मनामध्ये तुझे ते ठाण मांडून राहणे
रूसने तुझ्यावरी मी वा मोहून बोलणे ॥
पुन्हा डंख जीवनाचे होऊ दे गं मला
सदा त्या नशेत धुंद असू दे गं मला ॥
ते तुझे दूरदूर जाणे क्षणिक जवळ येणे
त्या क्षणाच्या मोहराचे नवीन गाणे होणे ॥
पुन्हा सूर हळवे ते गाऊ दे गं मला
हरवून डोळ्यात गूढ जगू दे गं मला ॥
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com
☘☘☘☘☘☘
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा