मस्तवाल ...
तोंडा मध्ये काहीबाही
चघळत चोखत अन थुंकत
अजस्त्र देह
धडधाकट
येती पुढे सरसावत
याचे त्याचे नाव
सांगत
कानावरती फोन ठेवत
लाल भगवा कधी निळा
टिळा कपाळी
लावलेला
छातीवरती कधी
बिल्ला
कधी टोपी घातलेला
डोळ्यामध्ये बेदरकार
सत्ता मद भरलेला
तोंडामध्ये उग्र
भाषा
उग्र श्वास उर्मटलेला
परिटघडीच्या पेहरावी
उन्मत्त गुंड
सजलेला
आम्ही तोडू आम्ही
फोडू
आडवे याल तर झोडू
भले बुरे कळल्यावाचून
समोरच्याला पार गाडू
हुकमी पोळ माजलेले
रेडे मस्तवाल वा
झाले
इवले डोके संस्कारावीन
धूर्तपणे कुणी
वापरले
होते दानव काय
वेगळे
दंगलखोर मती
मेलेले
बाहूच्या मदात
माजले
अन शेवटी मातीत
गेले
तीच वर्तुळे
पुनःपुन्हा
नियती फिरवे
गरागरा
समजून उमजूनही होतो
या दुनियेचा का पोतेरा
डॉ. विक्रांत
प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in/
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा