बुधवार, २८ सप्टेंबर, २०१६

मोर्चे काढूयात !!





चला मोर्चे काढूयात
आपली ताकद जगा दावूयात
त्याच जुन्या फाटल्या विजारी
पुन्हा उघड्यावर ठेवूयात
फार सरमिसळ झाली इथे
भाईबंद हो वेगळे होवूयात
भिंती तुटल्या आळीमधल्या
आपापल्या पुन्हा बांधूयात
बोलायचे खूप राहीले
गुळणी थुंकून टाकूयात
तोंडातल्या शिव्या विसरल्या
चव पुन्हा ती घेवूयात
राजे आपण होतो यार
राजेपनी पुन्हा मिरवूयात
प्रजा माजली बंड जाहली
ठेचून पुन्हा काढूयात
हक्क मागतो आणि काय
उंचावरती  बसूयात
वंश आपला सर्वश्रेष्ठ हा  
झेंडा नभी रोवूयात

डॉ विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://Kavitesathikavita.blogspot.in




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मागणे

मागणे ***** आता माझे हे एकच मागणे दत्तात्रयी राहणे घडो यावे ॥ हृदयी धडधड व्हावी दत्त दत्त  स्पर्शात दृष्टीत भरावा तो...