मंगळवार, २७ सप्टेंबर, २०१६

ती आजच गेली







कळले ती आजच गेली   
खर म्हणजे सुटली ती  
तेच मरण तसेच पुन्हा
फक्त वेगळी होती आकृती

एक दिवस अगदी तसाच 
फक्त काही तिथी वेगळी
साकळलेले दु:ख सांडले
अन वाहती जखम झाली

हळूहळू तो देह झिजणे    
आणिक सरणे श्वासाचे
असह्य वेदनांचे ओझे  
उरी भय तरी सुटण्याचे

मरणाचे ते सारेच रंग
गडद ठाशीव होते मांडले
अर्धे अधुरे असेच एक
फुल कोमेजून पडले

वाहणार होते अश्रू वाहिले
गाव ओले चिंब झाले
क्रियाकर्म मंत्र उगाच
सोपस्कार पार पडले

काहीतरी पण कुणाचे
नक्कीच इथे आहे चुकते
स्वप्न असावे जग सारे
किंवा मान्य करावे लागते  

डॉ विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://Kavitesathikavita.blogspot.in

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मागणे

मागणे ***** आता माझे हे एकच मागणे दत्तात्रयी राहणे घडो यावे ॥ हृदयी धडधड व्हावी दत्त दत्त  स्पर्शात दृष्टीत भरावा तो...