मुखवटे तेच परी
मजला नवीन आहे
आज सारे सेवाधारी
द्वेषात सजून आहे
भेटले सारे
प्रवासी
नकोसे स्मरण आहे
हातातले ओझे देणे
वाटते मरण आहे
मागणे माझे कुणाला
जणू जयगाण आहे
धुत्कारने ते
कुणाचे
आसुरी उधान आहे
आभार जीवनाचे की
शाप वरदान आहे
त्या व्यथांच्या
लत्कारांची
गोधडी ही उन आहे
जाणीव जाळून त्यांनी
मांडले थैमान आहे
माझ्या जाणण्यास नवे
हे एक अंगण आहे
डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा