कळले ते जगता
यावे
हीच प्रार्थना
जीवना
पाहता पहाता माझे
मला
तुला पाहता यावे
जीवना
खोलवर आत आत
पुन्हा एकदा उतरतांना
जाणीवेला बळ येवू
दे
पावूल पुढे
पडतांना
उतरलेले ओझे अन
मिटलेल्या चिंताना
पुन्हा वाव न
मिळावा
स्मृतीच्या अंगणा
निवळवा डोह हळूहळू
झरा नवा फुटतांना
अन मग मी वाहत
जावे
कुठल्याही कारणाविना
डॉ विक्रांत
प्रभाकर तिकोने
http://Kavitesathikavita.blogspot.in
http://Kavitesathikavita.blogspot.in
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा