पेटल्या सावुल्या
भर पावसात
पाहीले आक्रीत थक्क झाले ||१पुण्याचे पावन दान हे गहन
रानात विरून हरवले ||२
चिंचेखाली देव शेंदूर फासला
प्रवासी फसला प्रसादात ||३
ओसाड मनात ध्यान सोंग शून्य
वांझपण धन्य प्रवसले ||४
हर हर हर मनाची चादर
आणली उधार हरवली ||५
विक्रांत कामना विरल्या गगना
सूर्य तारांगणा कण झाला ||६
डॉ. विक्रांत प्रभाकर तिकोणे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा