संताचे दर्शने
सुखावले मन
घडले साधन काही
एक ||
संतांचे संगती
कळले उपाय
चुकलेले पाय
सावरले ||
संतांचे भाषण
हळूच फुंकर
पोळले जिव्हार
शांत झाले ||
संतांचे चरणी लागला विक्रांत
हरवला पथ दिसू
आला ||
डॉ विक्रांत प्रभाकर तिकोने
http://Kavitesathikavita.blogspot.in
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा