जेव्हापासून कळले मजला कि जीवनाचे नाव मरणे आहे . डोक्यास बांधून कफ़न मी ,त्या मारेकऱ्यास शोधतो आहे. (अनुवादित)
रविवार, २० ऑक्टोबर, २०१९
शनिवार, १९ ऑक्टोबर, २०१९
कारभार
कारभार
*
दत्त हसवितो
दत्त रडवितो
दत्त दाखवितो
सुखदुःखे
.
दत्त चालवितो
दत्त थांबवितो
दत्त बळ देतो
यातायाती
.
अवघे दत्ताचे
करणे धरणे
आम्ही तो वाहणे
तया कृपे
.
मग सांगा दत्ता
काय ते मागावे
व्यर्थ दवडावे
निर्व्याजता
.
विक्रांत दत्ताचा
म्हणतो दत्ताला
बरा चालवला
कारभार
.
© डॉ.विक्रांत प्रभाकर
तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com
***शुक्रवार, १८ ऑक्टोबर, २०१९
दत्ताची लेकुरे
दत्ताची लेकुरे
***************
आम्ही दत्ताची लेकुरे
आम्ही भक्तांची सोयरे
सुखे झाडू वाट त्यांची
घेवू धुळ त्या पायांची
शब्द श्रवणी झेलून
करू जीव लिंबलोणं
दत्त शब्द त्या मुखाचे
जणू मेघ अमृताचे
दत्त तया वचनात
येई यया हृदयात
दत्तप्रभूंचे जणू ते
घर चालते बोलते
विक्रांत शरण तया
पदी अंथरीतो काया
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com
गुरुवार, १७ ऑक्टोबर, २०१९
दत्त दत्त वदे
दत्त दत्त वदे
**********
दत्त दत्त वदे
दत्त आहे कुठे
आकाशी थेंबोटे
भरलेले
दत्त दत्त वदे
पान टाळ कुटे
देठ हळू सुटे
नादावले
दत्त दत्त वदे
वारा देही भिडे
निर्वाताचे कोडे
शिणलेले
दत्त दत्त वदे
लहरीचे गाणे
कातळाचे जीणे
झिजलेले
दत्त दत्त वदे
शब्द सारे खुळे
येती दत्तबळे
विक्रांतचे
**
© डॉ.विक्रांत प्रभाकर
तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com
***सोमवार, १४ ऑक्टोबर, २०१९
झोळी
झोळी
*****
साऱ्याच माझ्या मर्यादा
ठाऊक आहे मजला
जरी भरजरी झोळी
भोक आहे रे तळाला॥
नाही म्हणजे त्याची ही
खंत आहेच जीवाला
काय करू पण यार
वाव नाही शिवायला ॥
एक छिद्र शिवताच
दुसरे तयार होते
मिळालेले घासभर
कसेबसे हाती येते ॥
बरे ही झोळी कधीच
टाकताही येत नाही
झोळी माझी की मी तिचा
काहीच कळत नाही ॥
माझ्या सकट झोळी ती
वाहिली मग दत्ताला
म्हणो जग भिकारडा
विक्रांत मुळी सुटला ॥
**
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com
रविवार, १३ ऑक्टोबर, २०१९
कल्पवृक्ष
कल्पवृक्ष
**
दत्त सुखाचा सुखाचा
कल्पवृक्ष आनंदाचा
प्रेमे भजिला भजिला
झाला साथी जीवनाचा
दत्त अभंग ओवीचा
शब्द सौदर्यी भरला
किती गायला गायला
जीव नच हा ध्यायला
दत्त प्रीतीचा प्रीतीचा
मागे होम सर्वस्वाचा
जन्म वाहता पदाला
झालो स्वामी जगताचा
दत्त भक्तीचा भक्तीचा
नाम रूपात ठसला
द्वैत खेळता खेळता
आत्मरुपात दिसला
दत्त कृपेचा कृपेचा
होय विक्रांत सोयरा
तेणे सरला सरला
जन्ममरणाचा फेरा
**
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com
शनिवार, १२ ऑक्टोबर, २०१९
तुझी भक्ती
.
.तुझी भक्ती
.तुझी भक्ती
**
दत्ता तुझी भक्ती
देई रे मजला
जेणे मी कृपेला
पात्र होय
.
तुजला भेटणे
तुझ्या भक्तीविन
येथे का घडून
कधी येथे
.
उपासतापास
ध्यानाचे प्रयास
योगाचे सायास
व्यर्थ येथे
.
एक चित्त दत्त
करी दयाघना
मज तुजविना
अन्य नको
.
मम ओठ दत्त
वदावे सतत
तुझिया प्रीतीत
धुंद व्हावे
.
आला रे विक्रांत
दत्त वेडा आला
म्ह्णू दे मजला
जग सारे .
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com
**
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
आळंदीत . .
आलो आळंदीत ************ आलो आळंदीत झालो आनंदीत देव समाधीत पाहियला भारावले तन भारावले मन गर्जे कणकण ज्ञानदेव जिवलग भेटी हरपल...
-
धिंडोरा ****** तुझिया कीर्तीचा पिटतो धिंडोरा दत्त दिगंबरा पानोपानी ॥ पाहिल्यावाचून वर्णीतो रूपाला गातसे कीर्तीला जागोजागी ...
-
उगाच जातेस हासून तू सारेच निर्धार मोडून तू मी ओढलेला अंधार माझा जाते क्षणात हरवून तू ॥ रव निसटल्या पाकळयांचे शब्द सहज विख...
-
कृपा तुझी ****** ज्ञानदेवी वृत्ती झाली तदाकार जगाचा विसर पडोनिया आनंद सागरी आनंदाची लाट होवून परत जावे जैसे चालो आता खेळ ...
-
देवदारी ***** महापूर देवदारी भक्तांचा या आला आला पावूनिया पंढरीला धन्य धन्य आज झाला ॥१ एक एक शिरोमणी भावभक्तीत न्हाईला एक एक...
-
माझी नर्मदा परिक्रमा ***************** दिनांक 8 फेब्रुवारी 26 ते 27 जून 26 अशी 140 दिवसांची परिक्रमा नर्मदा मैयेने पूर्ण करून...
-
झाकलिया घटीचा दिवा । नेणिजे काय झाला केधवा । यारीती जो पांडवा । देह ठेवी ...ज्ञानेश्वरी मरण ***** असे हवे रे सुंदर मरण ज्यात ओघळून जाईल ज...
-
फ्रेम आणि चित्र ************ जेव्हा जेव्हा कानी सखी शब्द येतो तेव्हा तेव्हा समोर तुझा चेहरा येतो बाकी छान पैकी चालू आहे जिंदग...
-
जगण्याच्या वाटा ************* जगण्याच्या माझ्या वाटा दत्ता याव्या तुझ्या पथा वाहिलेला भार आता उतरावा तुझे हाता काय काय पोतड...
-
वाट (नर्मदा काठावरील कविता) ******* देही सजलेली वाट मळलेली उधळून माती नभी दाटलेली तीच तीच वाट जरी पायाखाली हर दिन नव्या स्पर्...
-
खडतर ***** किती खडतर असे तुझी भक्ती पाहूनिया मती कुंठीत ही जरी बळ नाही आता माझे ठाई तरी झोंबू पाही मिळवाया जाणतो मी हीन दीन...






