गुरुवार, १७ ऑक्टोबर, २०१९

दत्त दत्त वदे





दत्त दत्त वदे
**********
दत्त दत्त वदे
दत्त आहे कुठे
आकाशी थेंबोटे
भरलेले

दत्त दत्त वदे
पान टाळ कुटे
देठ हळू सुटे  
नादावले

दत्त दत्त वदे
वारा देही भिडे
निर्वाताचे  कोडे
शिणलेले

दत्त दत्त वदे
लहरीचे गाणे
कातळाचे जीणे  
झिजलेले

दत्त दत्त वदे
शब्द सारे खुळे
येती दत्तबळे
विक्रांतचे

**
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com
***

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

गिरनार परिक्रमा

गिरनार परिक्रमा *********** सरला प्रवास परी तुझा भास  वेढून मनास आहे दत्ता ॥१ माझे पदरव मज ऐकू येती  तरंग  गुंजती पाण्यावर ॥२ पा...