शनिवार, १२ ऑक्टोबर, २०१९

तुझी भक्ती

.


.तुझी भक्ती
**
दत्ता तुझी भक्ती
देई रे मजला
जेणे मी कृपेला
पात्र होय
.
तुजला भेटणे
तुझ्या भक्तीविन
येथे का घडून
कधी येथे
.
उपासतापास
ध्यानाचे प्रयास
योगाचे सायास
व्यर्थ येथे
.
एक चित्त दत्त
करी दयाघना
मज तुजविना
अन्य नको
.
मम ओठ दत्त
वदावे सतत
तुझिया प्रीतीत
धुंद व्हावे
.
आला रे विक्रांत
दत्त वेडा आला
म्ह्णू दे मजला
जग सारे .
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे https://kavitesathikavita.blogspot.com
**

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रार्थना

प्रार्थना ******* जाहले दर्शन तृप्त झाले मन  देखीले सगुण  परब्रम्ह  हास्य मुग्ध मुखी हात उंचावले  आशिष भरले  प्रेममय  परमपवित्र ...