रविवार, १३ ऑक्टोबर, २०१९

कल्पवृक्ष

 
 कल्पवृक्ष 
 **
दत्त सुखाचा सुखाचा
कल्पवृक्ष आनंदाचा
प्रेमे भजिला भजिला
झाला साथी जीवनाचा

दत्त अभंग ओवीचा
शब्द  सौदर्यी भरला
किती गायला गायला
जीव नच हा ध्यायला

दत्त प्रीतीचा प्रीतीचा
मागे  होम सर्वस्वाचा
जन्म वाहता पदाला
झालो स्वामी जगताचा

दत्त भक्तीचा भक्तीचा
नाम रूपात ठसला
द्वैत खेळता खेळता
आत्मरुपात दिसला

दत्त कृपेचा कृपेचा
होय विक्रांत सोयरा
तेणे सरला सरला
जन्ममरणाचा फेरा
**
 © डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

गिरनार परिक्रमा

गिरनार परिक्रमा *********** सरला प्रवास परी तुझा भास  वेढून मनास आहे दत्ता ॥१ माझे पदरव मज ऐकू येती  तरंग  गुंजती पाण्यावर ॥२ पा...