सोमवार, १४ ऑक्टोबर, २०१९

झोळी


झोळी
*****
साऱ्याच माझ्या मर्यादा
ठाऊक आहे मजला
जरी भरजरी झोळी
भोक आहे रे तळाला॥

नाही म्हणजे त्याची ही
खंत आहेच जीवाला
काय करू पण यार
वाव नाही शिवायला ॥

एक छिद्र शिवताच
दुसरे तयार होते
मिळालेले घासभर
कसेबसे हाती येते ॥

बरे ही झोळी कधीच
टाकताही येत नाही
झोळी माझी की मी तिचा
काहीच कळत नाही ॥

माझ्या सकट झोळी ती
वाहिली मग दत्ताला
म्हणो जग भिकारडा
विक्रांत मुळी सुटला ॥
**
 © डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

गिरनार परिक्रमा

गिरनार परिक्रमा *********** सरला प्रवास परी तुझा भास  वेढून मनास आहे दत्ता ॥१ माझे पदरव मज ऐकू येती  तरंग  गुंजती पाण्यावर ॥२ पा...