गुरुवार, ३१ ऑक्टोबर, २०१९

रिता घट





विक्रांत रिता हा
घट काठावर
असे अहंकार
भरलेला

उचल दयाळा
लावी रे धारेला
आदळी तयाला
इथे तिथे

भरावा बुडून
अथवा फुटून
जावा हरवून
चैतन्यात

भरल्या वाचून
घट जन्म व्यर्थ
त्याला नच अर्थ
काही इथे

भरणे बुडणे
फुटणे वाहणे
अवघे घडणे
तुझ्या हाती 




© डॉ..विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

कळत नाही

कळत नाही ******* हे आंदोलन कुणाचे आम्हाला खरंच नाही कळत यातून कुणाला फायदा मिळणार आम्हाला खरंच नाही उमजत लाखो रुपयांच्या गाड्या ...