जेव्हापासून कळले मजला कि जीवनाचे नाव मरणे आहे . डोक्यास बांधून कफ़न मी ,त्या मारेकऱ्यास शोधतो आहे. (अनुवादित)
सोमवार, १८ ऑगस्ट, २०१४
रविवार, १७ ऑगस्ट, २०१४
हळूच ये
हळूच ये
माझे शब्द
गुपचूप
ऐकूण घे
ताईबाई
झोपताच
सामसूम
होताच
जरासेच
खोडकर
बोल तुझे
मला दे
फार काही
मागतो ना
गळा गळी
घालतो ना
वेडा आहे
वेडेपण हे
माझे जरा
समजून घे
हसतांना
गोड तुला
बोलतांना
ठोक तुला
माझे पण
तुझ्यामध्ये
हलकेच
हरवू दे
किती पाहू
वाट आता
आडोसा ही
ठरे बाधा
व्याकुळला
जीव माझा
संजीवन
स्पर्श तुझा
उभा आहे
उन्हामध्ये
सावलीचे
छत्र दे
फार काही
नाही तर
स्माईलीची
भेट दे
विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/
शोधात जन्म देवा
येवू देत कुठूनही
सारी वेदनाच आहे
विझविण्यास सामर्थ्य
पण फुंकरीत आहे
हे जीवनाच्या मालका
देणे तुज कर आहे
मरणकाळी अवेळी
सारे पण माफ आहे
प्रत्येक गाणे चांगले
रे असे कुठे होते का ?
सारे जुगारी जिंकति
असे कधी घडते का ?
वाटते तयांस की हा
साराच खेळ मजेचा
रुतती हाडात बेड्या
प्रकार असे सजेचा
सारेच ते सुज्ञ येथे
सारेच जरी जाणते
प्रत्येक प्रवचनात
सत्य दडुनी हासते
दे भीतीला मिठी किंवा
कर भोवती गढी वा
घडणारे घडे अंती
शोधात जन्म या देवा
डॉ विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in
शनिवार, १६ ऑगस्ट, २०१४
अट कसलीच नाही
आज वेडी वाट माझी रिक्त उदास जाहली
का न कळे सखी माझी अजुनी आलीच नाही
मांडवात फुले किती बहरूनी बाग गेली
गंध मोगरीचा धुंद मनी भिनलाच नाही
मी शब्द अंथरूनिया उभा असे हा कधीचा
उचलुनी त्या कधी ती वाह म्हटलीच
नाही
नको भिउस जगाला उगा अथवा स्व:तला
सांग प्रीती तुझी तुज काय कळलीच
नाही
नच रुपात प्रेम वा नच धनात प्रेम हे
ये अशी उगा उगाच अट कसलीच नाही
जगतात जगी लाख मरतात किती लाख
प्रीती वाचून परी ते सखी जगणेच नाही
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
धुनी
धुनी ***** माय नर्मदा प्रवाही गेला ओंडका वाहत किती पार केली गावे किती ओलांडले घाट जल गेले हरपून नील रत्न सागरात परी राहिला ओंड...
-
हिरण्यगर्भी ******* पसरे प्रकाश निळ्या नभांतरी स्वर्ण जरतारी धागियात ।। कोण उधळतो कोण सावरतो स्थिर फिरवितो परिघात ।। अनंत ...
-
अधिक देखणे तरी निरंजन पाहणे भावार्थ ******************************** अधिक देखणे तरी निरंजन पाहणे योगीराज विनविणे मना आले वो माय...
-
येणारा प्रत्येक दिवस जगतो आपण म्हणजे तीच चाकोरी तोच नित्यक्रम एक मार्ग एक ठरलेली कृती अन पक्क्या प्रतिक...
-
गणराय ****** नागबंध ब्रहमसुत्र पिंगलेस शुंडावक्र रिद्धीसिद्धी दोन्हीकडे डोईवर स्वर्ण छत्र ॥ मदमस्त गंडस्थळ रक्त वर्ण सतीबाळ न...
-
धुनी ***** माय नर्मदा प्रवाही गेला ओंडका वाहत किती पार केली गावे किती ओलांडले घाट जल गेले हरपून नील रत्न सागरात परी राहिला ओंड...
-
लालायित ****** तुझिया कृपेला झालो लालायीत म्हणून दारात उभा राही तुझिया प्रीतीत जाहलो आशिक होऊन बटिक दारी आलो तुझिया नावाचा जा...
-
मिठीत जगणे होते मिठीत मरण आले हाती जपायचे होते हातीच सारे संपले मोडुनी घर पडले स्वप्न मातीत सं...
-
तुझे डोळे ***** तुझे डोळे चांदण्यांचे बावरल्या हरीणीचे दूर कुठे अडकल्या गायीच्या गं दावणीचे . तुझे डोळे नवाईचे घनदाट...
-
नको तेच काज *****:***** नको तेच काज देऊनिया दत्त बसला हसत दूरवरी ॥ भरतेय पोट चालतेय घर वाहतो संसार पाठीवर ॥ करतो गुलामी ज...
-
देहाचा या वृक्ष हलतो डोलतो श्वासाच्या लयीत गरारा फिरतो डोळ्यांच्या गुहेत खेचरी ओढतो हर क्षण कण ...



