शनिवार, १६ ऑगस्ट, २०१४

अट कसलीच नाही










आज वेडी वाट माझी रिक्त उदास जाहली  
का न कळे सखी माझी अजुनी आलीच नाही

मांडवात फुले किती बहरूनी बाग गेली
गंध मोगरीचा धुंद मनी भिनलाच नाही

मी शब्द अंथरूनिया उभा असे हा कधीचा
उचलुनी त्या कधी ती वाह म्हटलीच नाही

नको भिउस जगाला उगा अथवा स्व:तला
सांग प्रीती तुझी तुज काय कळलीच नाही

नच रुपात प्रेम वा नच धनात प्रेम हे
ये अशी उगा उगाच अट कसलीच नाही

जगतात जगी लाख मरतात किती लाख
प्रीती वाचून परी ते सखी जगणेच नाही

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

वृक्ष वंश उच्छेद

वृक्ष वंश उच्छेद ********* जळताच झाड मन विद्ध होते  तोडताच झाड मन कळवळते  एकेक झाडात लक्षावधी जीव  राहतात प्रेमाने करुनिया गाव  ...