येवू देत कुठूनही
सारी वेदनाच आहे
विझविण्यास सामर्थ्य
पण फुंकरीत आहे
हे जीवनाच्या मालका
देणे तुज कर आहे
मरणकाळी अवेळी
सारे पण माफ आहे
प्रत्येक गाणे चांगले
रे असे कुठे होते का ?
सारे जुगारी जिंकति
असे कधी घडते का ?
वाटते तयांस की हा
साराच खेळ मजेचा
रुतती हाडात बेड्या
प्रकार असे सजेचा
सारेच ते सुज्ञ येथे
सारेच जरी जाणते
प्रत्येक प्रवचनात
सत्य दडुनी हासते
दे भीतीला मिठी किंवा
कर भोवती गढी वा
घडणारे घडे अंती
शोधात जन्म या देवा
डॉ विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा