प्रियतम
******
तुझिया शब्दाची भूल मनावर प्रीत खोलवर रुजलेली ॥
तुझ्या स्मिताची मधु उधळण
वेचता वेचून सरती ना ॥
तुझे ते पाहणे डोळे उजळून
मन हरखून खुळे होते ॥
तुझिया स्पर्शात चैतन्य चांदणे
देह होतो गाणे सुरावले ॥
तव परिमळ धुंद चंदनाचा
कस्तुरी उटीचा विश्वाकार ॥
इंद्रिया वेढून नेशी पलीकडे
प्रियतम कोडे जीवीचे तू ॥
तुझिया ध्यानात नावात प्रेमात
जीवन वाहत राहो सारे ॥
पुनः पुन्हा घ्यावा जन्म तुझ्यासाठी
तुजविण चित्ती नको अन्य ॥
आनंद विभोर होय कणकण
तुजला स्मरण करताच ॥
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com
☘☘☘☘
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा