रस
****
कैवल्याचा रस वाहे पानोपानी हिरवा होऊनी सळाळता ॥
जगती नांदता येतसे कंटाळा
आतला उमाळा नावरतो ॥
झन झन झन चालले कंपण
पिंजारी कोठून आला बरे ॥
कण कण कण मन ये पिंजून
विचार कुंठुन जाती क्षणी ॥
कुण्या विरहात डोळा येई पाणी
ओठात दाटूनी शब्द खुळे ॥
कधी अनामिक नशा ये दाटून
वाटते झिंगून सृष्टी गेली ॥
वरुषती घन साऱ्या दिशातून
भिजल्या वाचून गती नाही ॥
भिजता भिजता जाहला मेघुटा
विक्रांत कोरडा होता कधी ॥
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com
☘☘☘☘
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा