रविवार, ४ जुलै, २०२१

ह्रदय भरू दे

प्रेमाने
*******
प्रेमाने ह्रदय 
माझे भरु दे रे 
द्वेष तो नको रे 
कुणाचाही ॥

केले अपकार 
ज्यांनी मजवर 
कृपा तयावर 
करी देवा ॥

असो अहंकार 
तयाला पदाचा 
ज्ञानाचा यातिचा 
काही जरी ॥

झाले गेले सारे 
मातीला मिळाले 
अन जे राहिले 
तेही जावो ॥

सुबुद्धी तयाला 
अन दे मजला 
रिते आकाशाला 
करी आता॥

विक्रांत पिकू दे 
गळून पडू दे 
जगाच्या येऊ दे 
काही काजा ॥


🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

शुन्याला भेटाया

शून्य ***** शून्याला भेटाया  शून्य हे अधीर  संमोहाचा तीर  सोडुनिया ॥ आकाशा आधार  खांब खांबावर  बांधून अपार  चढू पाहे ॥ मिटताच डो...