बुधवार, २४ मार्च, २०२१

जळणारी वात

जळणारी वात
*********

लक्ष योनी फिरत 
जाईन मी भ्रमत 
सदोदित  दत्त 
आठवीत ॥१॥

काळाचे ना भान
आकाशाचे मान 
मिटलेला प्राण 
घेवुनिया ॥२॥

याच या क्षणात
जळणारी वात 
होवून सतत
प्रकाशाची ॥३॥

विक्रांता उजेडी 
जळण्याची आस 
कळण्याचा सोस 
उपजून  ॥४॥

देई बापा दृष्टि
ह्रदयात भक्ती 
शब्द नेति नेति 
हरवून॥५॥
**********
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
**********

1 टिप्पणी:

  1. खूप सुंदर आहेत साऱ्या मन भावना।
    ही सारी दत्त लिलाच म्हणावी।
    एक गिरनारची अनुभूती ही व्यक्त व्हावी
    स्वर्गानूभुती ही गिरनारी च आहे।

    उत्तर द्याहटवा

निळा प्रश्न

निळा प्रश्न *********** निळी सावली आभाळात  सांग कुणाची आहे पडते ॥ सूर्य येऊनि चंद्र फुलुनि  निळी निळाई का न ढळते ॥ पोकळीत या अवक...