बुधवार, २४ मार्च, २०२१

जळणारी वात

जळणारी वात
*********

लक्ष योनी फिरत 
जाईन मी भ्रमत 
सदोदित  दत्त 
आठवीत ॥१॥

काळाचे ना भान
आकाशाचे मान 
मिटलेला प्राण 
घेवुनिया ॥२॥

याच या क्षणात
जळणारी वात 
होवून सतत
प्रकाशाची ॥३॥

विक्रांता उजेडी 
जळण्याची आस 
कळण्याचा सोस 
उपजून  ॥४॥

देई बापा दृष्टि
ह्रदयात भक्ती 
शब्द नेति नेति 
हरवून॥५॥
**********
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
**********

1 टिप्पणी:

  1. खूप सुंदर आहेत साऱ्या मन भावना।
    ही सारी दत्त लिलाच म्हणावी।
    एक गिरनारची अनुभूती ही व्यक्त व्हावी
    स्वर्गानूभुती ही गिरनारी च आहे।

    उत्तर द्याहटवा

नशीब( उपक्रमासाठी)

नशीब   (उपक्रमासाठी  ) ******* घडणाऱ्या घटनांचा अर्थ कळत नाही  क्रम उमजत नाही  कारण मीमांसा कळत नाही  बोल कुणाला देता येत नाही  ...