सोमवार, ८ जुलै, २०१९

मनाचा बाजार


मनाचा सुमार
चालला बाजार
नच अंतपार
याला दत्ता

हवेपणाला या
अंतर पडेना
स्वप्नांची सरेना
मोजदाद ॥

एक मिळताच
चिकटे दुजाला
मोहाच्या झाडाला
लाख फुले ॥

का रे तडफड
व्यर्थ धडपड
जरी डोईजड
उतरेना ॥

मोहात धावते
पापाला बुजते
अडते रडते
रात्रंदिन ॥

विक्रांत मनाला
वाहितो तुजला 
स्वीकारा दयाळा
दत्तात्रेया

 डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे

http://kavitesathikavita.blogspot.in‍

००००


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

इथे तिथे

इथे तिथे ******* रे ते गाव माझे होते  की हे गाव माझे आहे मज कळेना काही की दोन्ही भास माझे आहे तिथे होती यातायात  उगा चालणे उन्हा...