सोमवार, १ जुलै, २०१९

तुझी आठवण


तुझी आठवण
**********
तुझी आठवण
आयुष्य भरून
चांदणे होऊन
ओघळते ॥

माझ्या अंधारात
क्षणभर पेटून
देई वरदान
प्रकाशाचे॥

जावे हरवून
तुझाच होवून
मी माझेपण
वाटे सदा॥

दुनिया जरी ही
बाजार होऊन
जातेय घेऊन
रोज मला॥

खुळी जरी मम
स्वप्न हरवून
सरले जीवन
नटलेले॥

खेद खंत नच
कधी ये दाटून
तुझाच होवून
जगतो मी॥

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in‍

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मागणे

मागणे ****** आकाश रक्त मागत आहे  धरती रक्त मागत आहे  पुसलेल्या भाळा वरचा ठिपका रक्त मागत आहे ॥ मना मनातील आक्रोश  पेटून तप्त होत...