प्रेमाची तू वाट
***********
जगताचे रंग
जाहले
फिकट
एक अवधूत
डोळीयात ॥
तीच धुन
कानी
वाजे
मंत्र मनी
जगतो
जीवनी
त्याच
नादे ॥
प्रारब्धाचा
भोग
देहाला
संसार
मना
दिगंबर
हाच सोस ॥
घडे मोडे
सारे
तयाच्या
मर्जीने
कृपेची
मागणे
मागे तरी ॥
विक्रांत
बरडी
चालतो
उन्हात
प्रेमाची
तू वाट
होय दत्ता ॥
डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा