गुरुवार, ११ जुलै, २०१९

पडावा हा देह


पडावा हा देह
तुझिया चरणी
ओघळून मनी
श्वासाचे या   

अन्य अवधूता
काही न मागणी
जन्माची कहाणी
तुच होय ॥

सुखाच्या हिंदोळी
दुःखाचे गचके
जागोजागी धक्के
द्द्ंडाचे ॥

सत्तेची घमेंड
पैशाचा वा माज
उन्मतांची गाज
येथे चाले ॥

नको देवराया
तमाचे हे जग
शोषितांचा ओघ
जिथे वाहे ॥

पापाची आंधळी
चाले कोशंबीर
कलि मनावर
राज्य करी ॥

विक्रांत शिणला
दोषात मळाला
केवळ उरला
तुज मुळे ॥

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in‍



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

श्रावणाची गाणी

श्रावणाची गाणी  ***************" तू श्रावणाची होत गाणी  येतोस माझ्या मनी  ही रात्र अष्टमीची  भरलेल्या काळ्या ढगांची  नेहमीच...