शुक्रवार, १९ जुलै, २०१९

चिंचा

चिंचा
*****
चिंचा चावता चावता
जीभ वेडावली काही
दात आंबले तरीही
नाही म्हणवत नाही

काही मधुर गोडस
कण रेंगाळती कुठे
असे विचित्र मिश्रण
जीव तयावरी जडे

लाल तपकिरी रंग
एक वेगळा सुगंध
तया स्मरता मनात
जीभ टाळूत हो बंद

वृक्ष थोराड प्रचंड
कोटी पानांचे जगत
तिथे असतात भूत
कधी खरं न वाटतं

फळ आम्र चिकू केळी
जरी मधुर चविष्ट
चिंच सम्राज्ञी रसांची
करी स्मरणे प्रकट
**
दत्त तसाच तो माझा
साथी सदैव सुखाचा
बाळ तारुण्य वार्धक्यी
असे रसनेचा राजा

 डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

किशोर पाटोळे

किशोर पाटोळे  (निवृतिदिना निमित्त) **"**** जांभळाचे पूर्णपणे  पाने गळून गेलेले झाड  कधी कोणी पाहिले आहे का ? अर्थात कोणीच न...