शनिवार, २० जुलै, २०१९

तृषार्थ पथिक




अवधुता विना
काहीच सुचेना
मन हे रमेना
अन्य कुठे ॥
चातकाची चोच
जाहले जगण
भेटावे जीवन
तया कैसे ॥
कासावीस जीव
लागली तहान
थिल्लर सेवन
घडेचिना ॥
कोसळ बा दत्ता
होय दयाघन
मज तुजविण
अन्य नाही ॥
विक्रांत युगाचा
तृषार्थ पथिक
आसरा क्षणिक
हृदयी दे ॥



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

जस्सी सिस्टर

जस्सी सिस्टर( निवृत्तीदिना निमित्त) ********** जस्सी सिस्टर बद्दल बोलायचे तर  त्या सुद्धा कॉटर्समध्येच राहायच्या  त्यांची मुलं आ...