फक्त एक कृपा कर
****************
प्रभू दत्ता माझ्यावर
फक्त एक कृपा कर
वाहणाऱ्या जगण्याचे
सावध साधन कर
तसे तर मन मला
कधीच आहे कळले
लाख प्रहार करूनी
मी पण नाही जळले
कुठे तरी वेडे बीज
व्यर्थ अंकुर धरते
गुण माया सोबतीत
नि सूर भरू पाहते
सुखांची ही भाषा आता
मला सोसवत नाही
विस्कटलेल्या स्वप्नात
रंग भरवत नाही
दे दृढ निर्विकारता
एकांत भरू दे चित्ता
अस्तित्वा स्पर्शू नये रे
जगण्यातील व्यर्थता
©डॉ.विक्रांत
प्रभाकर तिकोणे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा