गुरुवार, १४ फेब्रुवारी, २०१९

सखी ते क्षण कालचे




सखी ते क्षण कालचे
*****************

सखी ते क्षण कालचे
जरी न आज उरले
नभांगण जरतारी
चांदण्यात कोंदाटले

विझल्या वणव्यातून
रानफुले डोकावती
गंधात व्यापुनी रान
ळीळी उमलती

तेच गीत वेळूतले
पुन्हा कानात गुंजते
येताच वाऱ्यास जाग
अंग अंग शहारते

ही साथ तुझी सखये
मला माझेपण देते
देह मना पल्याड तू
स्वप्न सदा जागवते

अजूनी या वाटेवर
मी तुला मी सोपवितो
हात तुझा साथ तुझी
गीत तुझे रेखाटतो

सरला माळ सारा
आता उतार हवा
चालणे हे तुझ्यामुळे
णाला रंग नवा 

© डॉ..विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सुटू द्यावे

सुटू द्यावे ******* असते सदैव साथ का कुणाची  सुटतात हात सुटू द्यावे ॥ खेळ जीवनाचा पहायचा किती  मिटतात डोळे मिटू द्यावे ॥ हातात न...