बुधवार, १३ फेब्रुवारी, २०१९

दत्त दिसला रे




दत्त दिसला रे
दत्त हसला रे
दत्त बसला रे
माझ्या मनी

दत्त कळला रे
दत्त वळला रे
दत्त फळला रे
दत्त नामी

जग सुटले रे
खोटे वाटले रे
नीट पाहिले रे
अंतरंगी

चित्त ले रे
गीत जमले रे
हट्ट फिटले रे
दृढ मनी

होय जागर रे
दत्ता सादर रे
घडे वावर रे
या दारी

ला विक्रांत रे  
गेला विक्रांत रे  
कुण्या क्षणात रे
ठाव नाही

असे जगत रे
नसे जगत रे
भरे दत्तात रे
सर्व काही  

© डॉ..विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मागणे

मागणे ***** आता माझे हे एकच मागणे दत्तात्रयी राहणे घडो यावे ॥ हृदयी धडधड व्हावी दत्त दत्त  स्पर्शात दृष्टीत भरावा तो...