सुनामी
तू आलीस
अचानक
एक सुनामी
होऊन
अन् एक
कहाणी
गेलीस समोर ठेवून
मी तर
बसलो होतो
नुकताच
सारे
आवरून
फुललेल्या
वसंताच्या
स्मृती
साऱ्याच
पुसून
चालत होतो
रोज रोज
त्याच पथी
चाकोरीतील
जीवन
वाहत अकारण
देह मन
गेलो गेलो
होतो
स्वतःस
विसरून
येताच तू मी ऐकले
हे
ह्रदयाचे धडधडणे
गात्रागात्रातील
थरार
अन् मनाचे झंकारणे .
कऴले
अचानक
अरे जीवन
बाकी आहे अजून
©डॉ.विक्रांत
प्रभाकर तिकोणे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा