कुणीतरी न्या हो
मज तया गाणगापुरी
मूर्ती अदृष्य
परी पद दाखवा ती गोजीरी ||
सुस्नास करुनी
मी भीमा अमरजा तीरी
धन्य होईन
प्रदक्षिणे तया पिंपळ उंबरी ||
चार घटिका
कुंडाशी त्या पाराशी थांबुन
लीला चरित्र ते
छान गुरु कौतुक आठवीन ||
भक्त सोयरे देखीन
तया डोळ्यात साठवीन
भूमी पावित्र
चुंबुन तेथ नतमस्तक होईन ||
तया पादुका वरी
माझा जीव ओवाळीन
तया पालखीच्या
भोई मी चरणी लोळीन ||
तया चैतन्य
प्रवाही ऋणी याचक होईन
कण विभुती होत
अवघा जन्म हा देईन ||
कली असुनी जन्म
ब्रह्मपदासी मिरवीन
अर्थ ऐसा मी माझ्या
भक्तीने बदलीन ||
विक्रांत
प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in