झिंग
*****
चुकार डोळे गर्द सावळे नच कळती रे कुठे गुंतले
यंत्र हातात गुपित ओठात
कोण चालले शोधत एकांत
आणिक चाहूल लागता जरा
का गोरामोरा तो होय चेहरा
मग वळून दिशा बदलून
जातेय कोण नजर चोरून
तरीही कळते कळणाऱ्याला
मीन लागला कुण्या गळाला
गळ कुणाचा घास कशाचा
शोध कुणा का उचापतीचा
धूर्त मासळी मृदू गोरटी
करते जे ते सारे जाणती
जा बाई तव घे आमिषाला
मेख त्यातली ठावुक तुजला
भीती सोडता रित मोडता
प्रीती रंगून ये तव हाता
असो खरी वा उगाच खोटी
झिंग आणते मदिरा ओठी
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com
☘☘☘☘ 🕉️
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा